शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने मेसेज उशिरा पाहिला; तोपर्यंत वडिलांनी जगाचा निरोप घेतला!, साताऱ्यातील हृदय हेलावून टाकणारी घटना

By दीपक शिंदे | Updated: June 30, 2023 16:40 IST

पोलिस करणार कसून तपास..

सातारा : सतत मोबाइलमध्ये डाेकं घालणं अतिरेक समजलं जातं. मात्र, उशिरा मोबाइल पाहणं हे सुद्धा पश्चात्तापाचे कारण ठरू शकतं, असा कोणी विचारही करणार नाही. परंतु असाच काहीसा प्रकार साताऱ्यातील एका मुलाच्या बाबतीत घडलाय. वडिलांनी रात्री आठ वाजता मुलाच्या व्हॉटसॲपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविला. मात्र, नेट बंद केल्यामुळे तो मेसेज वेळेवर पाहू शकला नाही. दोन तासांनंतर जेव्हा मुलाने मेसेज पाहिला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली; परंतु तोपर्यंत फार वेळ झाला होता. त्याच्या वडिलांनी या जगाचा केव्हाच निरोप घेतला होता.संदीप जाधव (वय ५५, रा. सदर बझार सातारा) यांनी दीड वर्षापूर्वी महेश या मुलाला दत्तक घेतले होते. ते एकटेच राहत असल्याने ते महेशच्या घरातून डबा घेऊन जात होते. काैटुंबिक ताणतणावात ते नेहमी वावरत होते. मंगळवारी दुपारी दत्तकपुत्र महेश याला त्यांनी बोलावून घेतले. ‘मला चायनीज खायचे आहे.’ असं सांगून ते त्याला वायसी काॅलेज परिसरात घेऊन गेले. दोघांनी चायनीज खाल्ल्यानंतर पुन्हा त्यांनी मला राजवाडा परिसरात फिरायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना दत्तक मुलाने राजवाडा परिसरात दुचाकीवरून नेले. तेथे काहीवेळ फिरल्यानंतर पुन्हा दोघेजण गोडोलीत गेले. ‘मी सदर बझारला जातो,’ असे सांगून संदीप जाधव निघून गेले. मात्र, काही वेळात परत दत्तक मुलगा राहत असलेल्या इमारतीजवळ आले. चाैथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी थेट खाली उडी मारून आत्महत्या केली. मुलगा महेश याने खाली येऊन पाहिले असता वडिलांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. १०८ रुग्ण वाहिकेवरील डाॅक्टरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संदीप जाधव यांना तपासले असता ते मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्री बारापर्यंत शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री महेश घरी आल्यानंतर मोबाइलचे नेट त्याने सुरू केले. त्यावेळी वडील संदीप जाधव यांनी आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे त्याला दिसले. हा मेसेज लवकर पाहिला असता तर कदाचित वडिलांचा जीव वाचला असता. मोबाइलचे नेट बंद ठेवल्याचा पश्चात्ताप वाटत असल्याचे मुलाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पोलिस करणार कसून तपास..संदीप जाधव यांनी कोणाच्या त्रासामुळे आत्महत्या केली. नेमकी कशी केली. टेरेसवर जाताना त्यांना कोणी पाहिले आहे का, आदी कारणांबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिस कसून तपासणी करणार आहेत. त्यानंतरच या प्रकरणातील आणखी विस्तृत माहिती समोर येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस