शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: नीरा नदीत बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेत्याचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 18:13 IST

मुराद पटेल शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रात बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेता सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, ...

मुराद पटेलशिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रात बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेता सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश,सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) याचा मृतदेह शोधण्यात तब्बल २८ तासानंतर यश आले. शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेकरिता उत्तरप्रदेश येथील फरसाण विक्रीकरिता साधारणपणे २० ते २५ व्यक्ती आले आहेत. दरम्यान, काल, सोमवार नीरा नदी पात्रात अंघोळीकरिता संबंधित विक्रेते गेले असता सुरेंदर शिकरवार बुडाला होता. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस, रेस्क्यू टिमसह घटनास्थळी शोधमोहीम राबविली. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे सुरेंदर याचा मृतदेह शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, आज मंगळवार पुन्हा सकाळी शिरवळ रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सहाय्याने शोधमोहीम राबविली असता शिरवळ रेस्क्यू टिमचे गोरख जाधव यांना सुरेंदर याचा मृतदेह सापडला. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू