शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुखसरी बरसणार.. ‘हे’ पक्षी देताहेत पावसाचे संकेत!, पक्षी अभ्यासकांचे निरीक्षण 

By संजय पाटील | Updated: June 2, 2025 15:19 IST

आवाज, हालचाली, कृतीसह रंगातही होतो बदल

संजय पाटीलकऱ्हाड : पाऊस येणार असल्याची आनंदवार्ता सुरुवातीला पक्षी देतात. त्यांच्या हालचाली, सुरेल आवाज, तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलातून पावसाचा ठोकताळा बांधला जातो. सध्या ग्रामीण भागात पावसासह इतर काही पर्जन्यदूत आपल्या कृतीतून पावसाचे संकेत देत असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात.निसर्ग निरीक्षणातून शेतकरी पावसाचा अंदाज बांधतात. या निसर्ग निरीक्षणात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची असते. पक्ष्यांच्या हालचाली, त्यांच्या कृती, रंगात होणारा बदल, सुरेल आवाजासह त्यांच्या घरटी बांधण्याच्या पद्धतीवरून पावसाचा अंदाज लावता येत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे. सध्या हवामानात झालेला बदल आणि गावोगावच्या शिवारात पर्जन्यदूत असलेल्या पक्ष्यांच्या हालचाली पाहता सुखसरी लवकरच बरसतील, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

आफ्रिकेतून येणारा चातकपावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून येणारा चातक पक्षी सर्वप्रथम देतो. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ..’ अशा सांकेतिक आवाजात ओरडायला लागला की, पाऊसकाळ जवळ आला, असे समजले जाते.

‘पेरते व्हा’ म्हणणारा पावशा..पावशा हा पक्षी पर्जन्यदूत मानला जातो. ‘पेरते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की, शेतकरी आजही मशागतीच्या कामाला सुरुवात करतात, हे विशेष.

तित्तीर पक्षाचा सांकेतिक स्वरअंगावर काळे-पांढरे ठिपके असलेला तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोड्यान केको, कोड्यान केको’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की, पाऊस येणार असे शेतकरी समजतात.

नवरंग देतो पावसाची वर्दीनवरंग पक्षी पावसाची वर्दी देतो आणि त्याच्या विशिष्ट आवाजाने पावसाची चाहूल लागते, असे पक्षी अभ्यासक सांगतात. शेतकरीही नवरंग पक्षाच्या आवाजावर पावसाचा अंदाज बांधतात.

पावसाचे संकेत देणारे इतर पक्षीतिबोटी खंड्या, निळ्या कानाचा खंड्या, छोटा खंड्या हे पक्षी मे महिन्यात पावसाची चाहूल दर्शवतात. तसेच, पाणकोंबडी आणि मोर हे पक्षी पावसाळ्यापूर्वी ओरडून पूर्वकल्पना देतात. कोकीळ, कावळा आणि चिमणीही आपल्या कृतीतून पावसाचे संकेत देत असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

प्रजनन काळात बरेच पक्षी अधिक सक्रिय आणि विशिष्ट आवाज करणारे असतात, जे बहुतेकदा पावसाळ्याशी जुळते. काही पक्षी पावसाळ्यात विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये किंवा वर्तन प्रदर्शित करतात. चमकदार पंख किंवा विशिष्ट आवाज काढतात. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड 

पक्षी विविध प्रकारे मान्सूनच्या आगमनाचे संकेत देऊ शकतात. पक्ष्यांच्या वर्तनात काही बदल होतात. हालचालीत वाढ होते. पावसाळा जवळ येताच ते अधिक सक्रिय आणि सुरेल आवाज काढतात. सध्या ग्रामीण भागात पक्ष्यांच्या अशा हालचाली दिसून येत आहेत. - डॉ. सुधीर कुंभार, पक्षी अभ्यासक, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbirds sanctuaryपक्षी अभयारण्यRainपाऊस