शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रयत साखर कारखाना निवडणूक: "त्या"अपात्र उमेदवारांचे आपिल फेटाळले, बिनविरोधचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 19:08 IST

विद्यमान अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील व त्यांचे चुलत बंधू अँड. आनंदराव पाटील यांनी परस्पर विरोधी पॅनेल निवडणूक रिंगणात

कराड : शेवाळवाडी (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 24 जुलै रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील व त्यांचे चुलत बंधू अँड. आनंदराव पाटील यांनी परस्पर विरोधी पॅनेल रिंगणात उतरवली आहेत.उदयसिंह पाटील गटाने विरोधी गटाच्या अर्जावर हरकती घेतल्याने त्यांचे काही अर्ज अवैध ठरले आहेत. पैकी 6 उमेदवारांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली होती. त्याची आज मंगळवारी साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांचे समोर सुनावणी झाली. त्याचा आज निकाल दिला आहे. त्या 6 जणांचे आपिल फेटाळण्यात आले आहे.

या कारखान्याची निवडणूक नेहमीच बिनविरोध झाली आहे. मात्र राजकीय स्थित्यंतरे झाल्याने यावर्षी प्रथमच निवडणूक होत आहे. त्यासाठी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे वारसदार अँड. उदयसिंह पाटील व कारखान्याचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांचे पुत्र अँड.आनंदराव पाटील हे दोन चुलत भाऊ आमने-सामने ठाकले आहेत.कारखान्या निवडणूक अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी, कराडचे उपनिबंध संदीप जाधव यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हरकत घेण्यात आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अँड. आनंदराव पाटील गटाचे काही अर्ज अवैध ठरवले. त्यामुळे अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलच्या काही उमेदवारांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र यातील दिनकर महादेव यादव (नारायणवाडी) कृष्णत भीमराव देसाई (तांबवे) बापू मारुती निंबाळकर (वसंतगड) निवास किसन देसाई (आणे)राजेंद्र बाबुराव पाटील (कुठरे)सुहास दत्तात्रय पाटील(म्होप्रे) या 6 उमेदवारांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे अपील केले होते.दरम्यान साखर आयुक्त कार्यालयात याबाबतची सुनावणी 5 जुलै रोजी झाली. साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी ते ऐकून घेऊन सुनावणी पूर्ण केली.मात्र निकाल राखून ठेवला होता. दरम्यान आज धनंजय डोईफोडे यांनी यांचा निकाल जाहीर केला असून त्या 6 जणांचे आपिल फेटाळण्यात आले आहे .त्यामुळे उदयसिंह पाटील गटाच्या ६ उमेदवारांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे.

रयत सहकारी साखर कारखाना निवडणुकी संदर्भातील 6 उमेदवारांनी दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी माझ्यासमोर पूर्ण झाली. मात्र ती आपील फेटाळण्यात आली आहेत. - धनंजय डोईफोडे प्रादेशिक सहसंचालक (साखर)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने