शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील वकिलाच्या खून प्रकरणातील आरोपीला साताऱ्यात अटक, गुन्हा घडल्यापासून होता फरारी

By दत्ता यादव | Updated: October 10, 2022 17:18 IST

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घडवून आणला होता गॅस सिलेंडरचा स्फोट

सातारा: जालना येथील वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी विकास गणेश मस्के याला साताऱ्यात अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे राहणाऱ्या मनीषा किरण लोखंडे यांचा विवाह ॲड किरण लोखंडे यांच्याशी मे 2022 मध्ये झाला होता. अवघ्या चार महिन्यातच त्या दोघांमध्ये भांडणे वाढली. त्यामुळे मनीषा किरण लोखंडे हिने तिचा साथीदार गणेश मिठू आगलावे (रा. वाल्हा, ता. बदनापूर जिल्हा जालना), विकास गणेश मस्के (रा. आनंदनगर अजंठा कॉलेज पाठीमागे जालना) यांच्या मदतीने 31 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री ॲड किरण लोखंडे यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांचा खून केला.त्यानंतर मृतदेह घरामध्ये ठेवून ते निघून गेले. दरम्यान 1 सप्टेंबर 2022 रोजी दोघे पुन्हा घरी आले. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करीत असताना त्यांनी स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरची पाईप काढून रेगुलेटर चालू ठेवून काडी लावली. त्यामुळे गॅसने पेट घेतला. मोठा स्फोट झाल्याने वकील किरण लोखंडे यांचा मृतदेह जळाला असल्याचा दोघांनी बनाव केला होता. पतीचा मृत्यू झाल्याबाबत पत्नीने पोलिसांना माहिती दिल्याने याबाबत अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आला होता.परंतु घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना संशय आला होता. हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी अखेर वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मनीषा लोखंडे व तिचा साथीदार गणेश आगलावे याला जालना पोलिसांनी अटक केली होती.परंतु, यातील आरोपी विकास मस्के हा गुन्हा घडल्यापासून फरारी होता. सातारा शहरातील मोळाचा ओढा  परिसरात रविवारी रात्री असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. या पथकाने मोळाचा ओढा परिसरात जाऊन सापळा रचून विकास मस्के याच्या मुस्क्या आवळल्या. त्यानंतर त्याला स्थानिक गुन्हे शाखेत आणण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस