शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
5
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
6
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
7
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
8
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
10
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
11
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
12
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
13
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
14
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
15
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
16
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
17
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
18
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
19
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
20
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
Daily Top 2Weekly Top 5

99th Marathi Sahitya Sammelan: संमेलनात प्रथमच १० माजी अध्यक्ष, रसिकांत अमाप उत्साह

By नितीन काळेल | Updated: January 1, 2026 17:03 IST

सारस्वतांची मांदियाळी 

नितीन काळेलसातारा : ऐतिहासिक सातारा शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य असे की, मागील अध्यक्षा डाॅ. तारा भवाळकर यांच्यासह १० माजी अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण चार दिवस संमेलनात सहभागी होणार आहेत. यामुळे सातारकर तसेच साहित्य रसिकांना त्यांना भेटण्याची संधीही प्राप्त होणार आहे.सातारा शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला यश आल्याने सातारकरांना २०२६ मधील ९९ वे संमेलन भरविण्याचा मान मिळाला. या संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील आहेत; तसेच हे संमेलन गुरुवार, दि. १ जानेवारीपासून सुरू होत आहे. रविवारपर्यंत चार दिवस विविध कार्यक्रमांनी संमेलन पार पडेल.सातारा शहरात महाराष्ट्राबरोबरच देशातून साहित्यिक, प्रकाशक तसेच साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत; पण या संमेलनात विविध वैशिष्ट्ये आणि पैलूही पाहावयास मिळणार आहेत. या संमेलनाचे खास वैशिष्ट म्हणजे दिल्लीत झालेल्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डाॅ. तारा भवाळकर या साताऱ्यात पाच दिवस असणार आहेत. याशिवाय संमेलनाचे इतर नऊ माजी अध्यक्षही संमेलनात चार दिवस सहभागी होणार आहेत. हे सर्वजण संमेलनाच्या व्यासपीठावर दिसतील. यापूर्वी झालेल्या संमेलनांत असे कधीही दिसून आले नव्हते. त्यामुळे साताऱ्याचे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

हे माजी अध्यक्ष संमेलनात असणार...- डाॅ. तारा भवाळकर (२०२५, दिल्ली)- डाॅ. रवींद्र शोभणे (२०२४, अमळनेर)- भारत सासणे (२०२२, उदगीर)- डाॅ. अरुणा ढेरे (२०१९, यवतमाळ)- लक्ष्मीकांत देशमुख (२०१८, बडोदा, गुजरात)- अक्षयकुमार काळे (२०१७, डोंबिवली)- श्रीपाल सबनीस (२०१६ पिंपरी चिंचवड)- सदानंद मोरे (२०१५, घुमान पंजाब)- फ. मुं. शिंदे (२०१४, सासवड)- उत्तम कांबळे (२०१०, ठाणे)

ऐतिहासिक सातारा शहरातील ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ‘न भूतो, न भविष्यती’ असेच होणार आहे. चार दिवस हा सोहळा रंगणार आहे. त्यामुळे सातारकरांबरोबच साहित्य रसिकांनी या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे. संमेलनाला मोफत प्रवेश आहे. त्यामुळे संमेलनाची संधी चुकवू नये. - विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

English
हिंदी सारांश
Web Title : 99th Marathi Literary Meet: 10 Former Presidents, Enthusiastic Response

Web Summary : Satara hosts the 99th Marathi Literary Meet, a historic event. Ten former presidents will attend the four-day gathering, offering a unique opportunity for literary enthusiasts to meet them. The event promises diverse programs and welcomes attendees from across India.