शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पोलीस ठाण्यातच आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, कऱ्हाडातील घटना

By संजय पाटील | Updated: August 11, 2023 23:44 IST

Satara: खंडणी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. या घटनेने पोलीस ठाण्यात धावपळ उडाली.

- संजय पाटीलकऱ्हाड - खंडणी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. या घटनेने पोलीस ठाण्यात धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

पवन देवकुळे (रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शहरातील मंडईत फळविक्री करणाऱ्या विलासराव जावळे यांना शस्त्राचा धाक दाखवून पवन देवकुळे याने खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस नाईक शशी काळे, कुलदीप कोळी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांच्या पथकाने आरोपी पवन देवकुळे याला ताब्यात घेऊन कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर फिर्यादी विलासराव जावळे यांची फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असतानाच पोलिसांसमोरच आरोपीने टेबलवरील काचेवर जोरात डोके आपटून तसेच फुटलेल्या काचेने स्वतःवर वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर सहाय्यक निरीक्षक गोरड, उपनिरीक्षक डांगे, शशी काळे, कुलदीप कोळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाईगिरीची भाषा वापरून खंडणी मागण्याचा प्रकार होत असल्यास तातडीने कऱ्हाड शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केले.

खंडणीसह आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाकऱ्हाड शहर पोलिसांनी पवन देवकुळे याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. मात्र, त्याने पोलीस ठाण्यातच टेबलवर डोके आपटून स्वतःला दुखापत करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर खंडणीसह आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर