थदाळेत तीन दिवस कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:54+5:302021-04-20T04:39:54+5:30
पळशी : थदाळे (ता. माण) येथे सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व वीस संशयित रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण ...

थदाळेत तीन दिवस कडकडीत बंद
पळशी : थदाळे (ता. माण) येथे सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व वीस संशयित रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून थदाळे ग्रामपंचायतीने तीन दिवस गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान सरपंच वैशाली शिंगाडे, उपसरपंच तायाप्पा शिंगाडे यांनी केले आहे.
थदाळे गावची लोकसंख्या ९०० च्या आसपास असून, गावातील बहुतांशी लोक नोकरी, उद्योगधंद्यासाठी, तसेच रंगकामासाठी मुंबईमध्ये असतात. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याच्या कारणाने मुंबईतील ग्रामस्थ काही दिवसांपूर्वी थदाळे येथे आले होते. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरला व सहाजण पॉझिटिव्ह सापडले, तर वीस नागरिक संशयित आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
थदाळे गावात तीन दिवसांचा लॉकडाऊन लावल्याचे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक यांनी जाहीर केले.