साताऱ्यात एसटीची प्रवाशांकडे पाठ !

By Admin | Updated: May 15, 2015 23:38 IST2015-05-15T21:28:49+5:302015-05-15T23:38:29+5:30

मध्यवर्ती बसस्थानक : फलाटांकडे तोंड करुन उभे करण्याच्या नियमांना चालकांकडून केराची टोपली...

Text to ST passengers in Satara! | साताऱ्यात एसटीची प्रवाशांकडे पाठ !

साताऱ्यात एसटीची प्रवाशांकडे पाठ !

सातारा : शाळा-महाविद्यालयांना लागलेल्या सुट्या, लग्नसराई यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गावोगावच्या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी गाड्या फलाटांकडे तोंड करुन उभ्या कराव्यात, असा नियम असतानाही सातारा मध्यवर्ती बसस्थानकात पुणे, फलटण, बारामती, सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या प्रवाशांकडे पाठ करुन उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रवाशांची पळापळ होत आहे.राज्य परिवहन महामंडळ ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन काम करत असताना दैवत असलेल्या प्रवाशांची गैरसोय टाळावी म्हणून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना करत असते. यासाठी परिपत्रकेही काढल्या होतात. मात्र, त्या पत्रकांची कडक अमलबजावणी खालच्या पातळीवर केली जात नसल्याचेच उघड होत आहे.
आगारातून येणाऱ्या किंवा बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्या यापूर्वीही रिव्हर्समध्ये आणून फलाटावर लावल्या जात असत. मात्र, संबंधीत गाडी कोठे जाणार आहे, हे पाहण्यासाठी जेष्ठ नागरिकांना पळापळ करावी लागते. त्यातून गर्दी असल्यास धक्काबुक्की होते. यासंदर्भात प्रवासीमित्र संघटनांनी काही वर्षांपूर्वी आवाज उठविला होता. याची दखल घेऊन बसस्थानकात येणाऱ्या गाड्या फलटाकडे तोंड करुन उभ्या कराव्यात, असे परिपत्रक मध्यवर्ती कार्यालयाकडून काही वर्षांपासून निघाले होते. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे.सातारा मध्यवर्ती बसस्थानकात मात्र सध्या गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोल्हापूर, सांगलीसह कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमानुसार फलाटाकडे तोंड करुन उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे फलटावर गाड्यांची प्रतीक्षा करत थांबलेल्यांना लांबूनही गाडी कोठे जाणार आहे, याची माहिती मिळते. अन् पळापळ, चेंगराचेंगली वाचते. याच्याच उलट चित्र पुणे, बारामती, सोलापूर, महाबळेश्वर, फलटण, अहमदनगर दिशांना जाणाऱ्या वाहनांच्या बाबतीत आहे. या फलाटावर लागणाऱ्या गाड्या झुणका भाकर केंद्रापर्यंत जातात. तेथून त्या पाठीमागे घेत फलाटाकडे पाठ करुन उभ्या केल्या जात असतात. उन्हाचा त्रास होऊ नये, लहान मुलं पळापळ करु नयेत, म्हणून ज्येष्ठ नागरिक, महिला साहित्य, मुलांना घेऊन बसस्थानकात थांबलेले असतात. याच ठिकाणी एसटी पाठमोरी येऊन उभी झाल्यास कोठे जाणार आहे, हे पाहण्यासाठी उठून जावे लागत आहे. त्याठिकाणी गेल्यानंतर संबंधीत गाडी दुसरीकडेच जाणार आहे, हे समजल्यावर पुन्हा फलाटावर यावे लागत आहे. यामुळे जेष्ठ नागरिक,महिला, महाविद्यालयीन तरुणींचे हाल होत आहेत. फलटाकडे तोंड करुन वाहने उभी करण्याच्या सूचना चालकांना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


यांचे झाले काय-बसस्थानकात आल्यानंतर तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी एकांत मिळत नाही. त्यामुळे भूकेमुळे बाळाला त्रास सहन करावा लागत होता. हे पाहून मातेच्या जीवाची घालमेल होत होती. यासाठी ‘हिरकनी कक्ष’ सुरू केले. मात्र, अनेक बसस्थानकात हे कक्ष नाहीत.
बसस्थानकात एसटी उभी राहिल्यानंतर पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी वाहकाने प्रवाशांना अभिवादन करण्याची संकल्पना आणली होती. यामध्ये वाहकाने स्वत:चे नाव सांगून एसटी बस कोठे जाणार आहे. या मार्गात कोठे-कोठे थांबणार आहे. किती वेळ थांबणार आहे, याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, ही योजना पंधरा दिवसही चालली नाही.

एसटीला फलक नसल्यास प्रवाशांची फसगत होते. त्यामुळे कोणतीही बस फलकाशिवाय धावणार नाही, असा आदेश जारी केला होता. मात्र, आजही अनेक गाड्यांना फलक दिसत नाहीत.
गळक्या गाड्या, उचकटलेले पत्रे यामुळे एसटीची प्रतीमा डागाळत आहे. त्यामुळे खराब बस दाखवा बक्षीस मिळवा, ही मोहिम राबविण्याचा महामंडळाचा विचार होता. यासाठी देण्यात येणारी बक्षिसाची रक्कम अधिकारी व चालक-वाहकाच्या पगारातून घेण्यात येणार असल्याने त्याला महामंडळातूनच विरोध झाला.


यांचे झाले काय
बसस्थानकात आल्यानंतर तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी एकांत मिळत नाही. त्यामुळे भूकेमुळे बाळाला त्रास सहन करावा लागत होता. हे पाहून मातेच्या जीवाची घालमेल होत होती. यासाठी ‘हिरकनी कक्ष’ सुरू केले. मात्र, अनेक बसस्थानकात हे कक्ष नाहीत.
बसस्थानकात एसटी उभी राहिल्यानंतर पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी वाहकाने प्रवाशांना अभिवादन करण्याची संकल्पना आणली होती. यामध्ये वाहकाने स्वत:चे नाव सांगून एसटी बस कोठे जाणार आहे. या मार्गात कोठे-कोठे थांबणार आहे. किती वेळ थांबणार आहे, याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, ही योजना पंधरा दिवसही चालली नाही.


नव्याचे नऊ दिवस...
एसटीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. खासगी स्पर्धेला तोंड देत असताना एसटीचा प्रवासी दूर जाऊ नये यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता चालक-वाहकांची नसल्याचे समोर येत आहे. त्याची अंमलबजावणी काही दिवस केली जाते, त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या,’ असे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Text to ST passengers in Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.