दंडात्मक कारवाईपेक्षा कोरोना टेस्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:45+5:302021-04-20T04:39:45+5:30
वडूज : झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहराची व्याप्ती पाहता प्रत्येक चौकात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस ...

दंडात्मक कारवाईपेक्षा कोरोना टेस्ट करा
वडूज : झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहराची व्याप्ती पाहता प्रत्येक चौकात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करीत आहे.
नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून नामी शक्कल लढवित चौकाचौकात रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू केली तर गर्दीचे प्रमाण कमी झालेले दिसून येईल. कोरोना वाढीचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यात बाधित असलेली व्यक्ती संपर्क इतिहास लपवू पाहत आहेत. त्यासाठी वेगळीच शक्कल लढविली तर पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचा ताण कमी होऊन रस्त्यावरची वर्दळ कमी होईल. यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून वेळीच पावले उचलली गेली तर वडूज शहरातील स्थिती आटोक्यात आणली जाऊ शकते. १६ ते ३० वयोगटांतील वाहनचालक विनाकारण फेरफटका मारताना दिसतात. कारवाई करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. तर प्रसंगी वादविवाद होताना दिसत आहेत. या नेत्यांचा कार्यकर्ता आहे, तर माझे नातलगही खात्यात आहेत. ‘लावू का फोन लावू का’ या पोकळ बोलण्यावरून टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. यासाठी विनात्रास वाहने जप्त करून कारवाई सुद्धा करून रॅपिड अँटिजेन तपासणी करावी म्हणजे बाधित समजतील आणि त्यांची रवानगी तातडीने विलगीकरण कक्षात करावी. तरच लोक विनाकारण फिरणार नाहीत. यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.
दंडात्मक कारवाई करून वाहने जप्त करावीत आणि संचारबंदी संपल्यानंतरच वाहने ताब्यात द्यावीत.
१९वडूज कारवाई
फोटो: विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर वडूज पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा दणकाच लावला आहे.( छाया : शेखर जाधव )