खासगी बसमध्ये सापडला ‘आतंकवादी’!
By Admin | Updated: October 9, 2015 21:50 IST2015-10-09T21:50:51+5:302015-10-09T21:50:51+5:30
महामार्गावर ‘मॉकड्रील’चा थरार : कमांडोंनी केली प्रवाशांची सुखरूप सुटका

खासगी बसमध्ये सापडला ‘आतंकवादी’!
प्रगती जाधव-पाटील -- सातारा--निमशहरी आणि महानगर या दोन्हींचे मिश्रण सध्या साताऱ्यात बघायला मिळत आहे. जुन्या संस्कृतीचे विचार आणि महानगरांप्रमाणे आचार अशा द्वंद्वात अडकलेल्या सातारकर महिला- पुरुषांना मोठ्या प्रमाणावर चिंता आणि तणावाने ग्रासले असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ज्येष्ठ त्रस्त आहेत. तर जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी येथील विद्यार्थ्यांची मानसिक धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारकरांच्याभोवती अजूनही समाज व्यवस्थेची घट्ट चौकट आहे. येथील माणसांमध्ये भावनिक ओलावा असल्याचे दिसते. मोठ्या शहरांसारखा तुसडेपणा नसला तरीही बेफिकीर जगण्याचे धाडसही येथे पाहायला मिळत नाही. सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे, हेच येथे अनेकांना ज्ञात नाही. मानसिक अस्वस्थता आणि त्याचे उपचार याविषयी फारशी जागरुकता दिसत नाही. शारीरिक तंदुरुस्तीसाठी औषधांचा डोस घेतो, त्याचप्रमाणे मनाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
यामुळे वाढतोय आजार
एकाकीपणा--मोठ्या शहरात नोकरीनिमित्त असणाऱ्या मुलांची वाट बघण्यात येथील अनेक घरातील ज्येष्ठांना एकाकीपणा सतावू लागला आहे. मोठ्या शहरात चुकल्यासारखे वाटणे आणि साताऱ्यात एकटे राहणे, अशा द्वंद्वात सध्या साताऱ्यातील ज्येष्ठ दिवस काढत आहेत.
व्यक्त होण्यास मर्यादा
‘तुला काय समजतंय’ हे वाक्य कमी अधिक प्रमाणात गृहिणींना ऐकायला मिळते. घरातील मोठ्यांनी मुलांपुढे हे वाक्य उच्चारल्यानंतर अनेक गृहिणींचे खच्चीकरण होते. त्यातून मग आपल्याला काहीच येत नाही, हा न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे महिलांना व्यक्त होण्यास मर्यादा पडतात.
म्हणे ठार वेडे : मानसोपचाराविषयी वाढते गैरसमज
मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे आपण ठार वेडे झाल्याचे लक्षण असते, असा समज अनेकांच्या मनात पक्का आहे. त्यामुळे मनातल्या मनात कुडणे, व्यक्त न होणे, मानसिक ताण नको इतका सहन करणे, या गोष्टी वाढत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत, हे समजल्यानंतर लोक काय म्हणतील, हा यक्षप्रश्न अनेकांना सतावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच हे उपचार टाळले जात असल्याचे साताऱ्यात पाहायला मिळते.
गृहिणींसाठी आर्थिक स्वातंत्र्य गरजेचे
गृहिणी असणाऱ्या अनेक महिलांना आपण घरात कामासाठीच आहोत, अशी भावना निर्माण होते. पतीने कमवून आणलेले पैसे हे त्याचेच असतात, असे समीकरण पाहायला मिळते. वास्तविक कुटुंबाची जबाबदारी घेणारी म्हणून गृहिणीला थोडे आर्थिक स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. माझ्या कमाईवर तुझाही हक्क आहे, हे जाणवून देणे आवश्यक आहे.
असे आहेत ताण...!
मुलं : आठवी ते बारावीत असलेल्या मुलांना तंत्रज्ञान , व्हिडीओ गेम, यामुळे निर्माण होणारी तोडफोड वृत्ती.
महिला : सर्वच ठिकाणी मी अव्वल असणार. सर्वांच्या इच्छा मीच पूर्ण करणार, अशी मानसिकता
पुरुष : काहीही झाले तरी मी कोसळणार नाही, मी खंबीर असलं पाहिजे, ही पारंपरिक भावना.
ज्येष्ठ : आता मी माझ्यापुरतं बघणार, मी परावलंबी आहे. घरातील अडगळ म्हणून स्वत:ची केलेली हेटाळणी.
हे आहेत उपाय.....!
१. घरातील कोणाही व्यक्तीचे वर्तन बदलले तर त्याकडे बारीक लक्ष ठेवा.
२. दिवसभर मुलांबरोबर असण्यापेक्षा केवळ एक तास खास मुलांसाठी वेळ काढून त्यांच्याबरोबर त्यांचे होऊन खेळा.
३. नोकरीच्यानिमित्ताने तुम्ही कुठेही बाहेर गावी राहत असला तरी पालकांच्या संपर्कात राहाच.