वडूज पोलीस ठाण्यात दहशतवाद, हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:25+5:302021-05-22T04:36:25+5:30
वडूज : दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या ...

वडूज पोलीस ठाण्यात दहशतवाद, हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा
वडूज
: दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस
पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या प्रांगणात महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना
प्रतिज्ञा दिली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा
विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना, ‘आम्ही भारताचे
नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा
बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सामना करू,’ अशी शपथ
घेण्यात आली. यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो २१वडूज
वडूज पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधात प्रतिज्ञा दिली. (छाया : शेखर जाधव)