शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

बिबट्याची दहशत; मालकावर आली रक्षणकर्त्या कुत्र्याचे रक्षण करण्याची वेळ; शेतकऱ्याने लढवली शक्कल.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:21 IST

बिबट्याच्या हल्ल्यापासून कुत्र्यांचच रक्षण करण्याची मालकांवर आली वेळ

पेट्री : कुत्रा म्हटले की घरदार, शेतीभाती, पाळीव प्राणी यांचा रक्षण कर्ता अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. जीवावर उदार होऊन तो रक्षणकर्त्याची भूमिका बजावत असतो. पण हल्ली बिबट्यांचा हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने बिबट्यांपासून कुत्र्यांचच रक्षण करण्याची वेळ मालकांवर आली आहे. त्यासाठी कास परिसरातील एका शेतकऱ्याने कुत्र्याच्या गळ्यात चक्क खिळ्यांचा पट्टा बांधला आहे.  कास पठार परिसर हा जंगल डोंगरदऱ्यांनी व्यापला आहे. कास पठार परिसरात अनेक छोट्या मोठ्या वस्त्या आहेत. पशुपालन व शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. दिवसभर जनावरे जंगलात चरण्यासाठी जात असतात. त्यांच्यासोबत गुराखी असतात. पण हल्ली वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता पाळीव प्राण्यांवर बिबट्या, तरस, लांडगे या प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे शेतकरी प्राण्यांच्या संरक्षणासाठी एक कुत्रा नेहमी सोबत ठेवतात. 

वन्यप्राण्यांना जंगलात पुरेसे खाद्य उपलब्ध नसल्याने हे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या प्राण्यांना घाबरवण्यासाठीही कुत्र्याची मदत होते. या पार्श्वभूमीवर कुत्रा हा घटक शेतकऱ्यांसाठी मोलाची भूमिका निभावत असतो पण अलीकडच्या काळात याच कुत्र्यांवर बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संक्रांत आली आहे. बिबट्या मानेला पकडून प्राण्यांना ठार करत असतो. हीच बाब लक्षात घेऊन कुसुंबीमुरा येथील शेतकरी पांडूरंग कोकरे यांनी कुत्र्याच्या मानेभोवती अनुकूचीदार खिळे असलेला पट्टा बसवलेला आहे. कधी कुत्र्यावर हल्ला झालाच तर मानेचे संरक्षण हा टोकदार खिळ्यांचा पट्टा करणार आहे.त्यामुळे कुत्र्याच्या मानेसारख्या संवेदनशील अवयवाचे संरक्षण झाल्याने प्राणघातक हल्ल्यापासून वाचणार आहे. ही युक्ती शेतकऱ्यांनी मोठ्या खुबीने केली आहे. चामड्याच्या जाड पट्ट्याला उलटे खिळे ठोकले आहेत. या खिळ्यांचा त्रास कुत्र्याला होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.  

कुत्र्याचे लहान पिल्लू ते मोठे कुत्रे होण्यापर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. हा कुत्रा घरातील एका सदस्याप्रमाणे असतो, आणि अचानक त्याच्यावर हल्ला होऊन आपल्यातून जान्याने मनाला वेदना होतात. या जीवाभावाच्या संवगड्याचे रक्षण करण्यासाठी ही युक्ती केली आहे. - पांडूरंग कोकरे, शेतकरी, कुसुंबीमुरा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याdogकुत्राFarmerशेतकरी