बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:19+5:302021-02-06T05:13:19+5:30
मलकापुरात गर्दी मलकापूर : येथील मलकापूर फाटा परिसरात अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होणे हा नित्याचा प्रकार बनला ...

बिबट्याची दहशत
मलकापुरात गर्दी
मलकापूर : येथील मलकापूर फाटा परिसरात अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होणे हा नित्याचा प्रकार बनला आहे़. सकाळी दहा व सायंकाळी पाच वाजण्याच्यासुमारास या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे़. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
नियमांचे उल्लंघन
कऱ्हाड : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच फूटपाथवर विनापरवाना जाहिरात फलक व्यापारी लावत आहेत. त्यामुळे पालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. काही ठिकाणी दुकानातील साहित्यही रस्त्यावर तसेच फूटपाथवर मांडण्यात आल्याचे दिसून येते.
दुभाजकात गवत (फोटो : ०४इन्फोबॉक्स०१)
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप या मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकात गवत वाढले आहे. त्यामुळे दुभाजकाचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. गवताबरोबरच दुभाजकात झुडपांचेही साम्राज्य आहे. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर विस्तारल्याने वाहतुकीस धोका निर्माण होत आहे.