दहाव्या दिवशी तिघांची माघार

By Admin | Updated: June 7, 2015 00:28 IST2015-06-07T00:27:56+5:302015-06-07T00:28:00+5:30

कृष्णा कारखाना निवडणूक

On the tenth day, three retreats | दहाव्या दिवशी तिघांची माघार

दहाव्या दिवशी तिघांची माघार

कऱ्हाड : शिवनगर - रेठरे बुद्रुक ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणूकीतून शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या दहाव्या दिवशी तिघा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात २८७ उमेदवारी अर्ज राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी दहा जून ही अंतिम मुदत आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होऊ घातली आहे. कारखाना निवडणूकीसाठी शनिवारपर्यंत २९० उमेदवारी अर्ज बाकी होते. त्यातील शनिवारी तिघा इच्छूकांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले. त्यामध्ये वडगाव हवेली - दुशेरे गटातून महादेव आनंदा लोकरे (येरवळे), मारूती गणपती जगताप (वडगाव हवेली), संजय आण्णासाहेब गरूड (येणके) यांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
महादेव लोकरे, मारूती जगताप, संजय गरूड यांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने २८७ इतकी उमेदवारांची संख्या बाकी राहिली आहे. आज अखेरपर्यंत ११ इच्छूकांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले आहे.
कऱ्हाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीमधील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात माघार घेणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the tenth day, three retreats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.