भाडेकरूनी मारला घरमालकाच्या घरातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST2021-07-14T04:43:25+5:302021-07-14T04:43:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भाडेकरूनी घरमालकांच्या अनुपस्थित घरातील तब्बल ५० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची खळबळजनक घटना भुईंजमध्ये उघडकीस ...

The tenant hit the landlord's house | भाडेकरूनी मारला घरमालकाच्या घरातील

भाडेकरूनी मारला घरमालकाच्या घरातील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : भाडेकरूनी घरमालकांच्या अनुपस्थित घरातील तब्बल ५० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची खळबळजनक घटना भुईंजमध्ये उघडकीस आली असून, याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिया नवनीत नाईक, नवनीत मधुकर नाईक (रा. भांडुप, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाईक दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून भुईंज येथील ज्ञानेश्वर दिनकर भोसले (वय ६३) यांच्या घरामध्ये भाड्याने राहत होते. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी भोसले यांच्या अनुपस्थित भाडेकरू नाईक दाम्पत्याने त्यांच्या घरामधील पेटीत ठेवलेले दागिने चोरून नेले. या दागिन्यांची किंमत सुमारे ५० हजार रुपये होती. दरम्यान, कोरोनाच्या आजारामुळे भोसले यांना तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार देता आली नाही. ते आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी भुईंज पोलीस ठाण्यात येत संबंधित भाडेकरू विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: The tenant hit the landlord's house