कोडोली येथे घरफोडीत दहा तोळे सोने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST2021-03-18T04:39:41+5:302021-03-18T04:39:41+5:30

सातारा : कोडोली येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याच्या ऐवजावर डल्ला ...

Ten weights of gold were stolen in a burglary at Kodoli | कोडोली येथे घरफोडीत दहा तोळे सोने चोरीला

कोडोली येथे घरफोडीत दहा तोळे सोने चोरीला

सातारा : कोडोली येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यामध्ये लक्ष्मीहार, सोन्याची चेन, अंगठी, नथ, मोबाइल व रोख दहा हजार रुपयांचा समावेश आहे. ही घटना दि. १० ते १६ मार्चदरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित तक्रारदार हे कुटुंबीयांसोबत परगावी गेले होते. बुधवारी सायंकाळी ते घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा तोडलेला दिसला. कपाटातील सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल दहा तोळे सोने चोरीस गेल्याने कोडोली परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गणपत बाळू सावंत (वय ७०, रा. कोडोली) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Ten weights of gold were stolen in a burglary at Kodoli