शेतकऱ्यांना दहा टक्के जादा पीक कर्ज
By Admin | Updated: July 22, 2014 22:12 IST2014-07-22T21:59:29+5:302014-07-22T22:12:07+5:30
बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील

शेतकऱ्यांना दहा टक्के जादा पीक कर्ज
सातारा : प्राथमिक विकास सेवा संस्थेच्या कर्जदार शेतकरी सभासदांना दुबार पीक पेरणीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अतिरिक्त कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी दिली.
सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, वाई, पाटण, माण, खटाव, जावली व महाबळेश्वर हे खरीप पिकाचे तालुके म्हणून महसुल दप्तरी नोंद आहेत. या तालुक्यांमधील प्राथमिक विकास सेवा संस्थांमार्फत बँकेच्या पिक संमत धोरणानुसार कर्जदार शेतकरी सभासदांना २०१४-२०१५ मधील खरीप पीक कर्जाचे वाटप १ एप्रिल पासून सुरू झाले आहे. याचे कर्जवाटपाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर पर्यंत आहे.
पावसाची सुरूवात खुपच उशीरा झाल्यामुळे काही भागात पेरण्या झाल्या नाहीत, तर काही भागात जूनमध्ये पडलेल्या वळीव पावसाचे धूळवाफीवर खरीप पिकांच्या अंशत: पेरण्या केल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी सभासदांना दिलासा देण्याच्यादृष्टीने जेथे पेरणीयोग्य पाऊस झाला आहे अशा ठिकाणच्या सभासदांनी खरीप पीक कर्जाची उचल केली असेल आणि त्यांनी पुन्हा दुबार पीक पेरणीसाठी कर्जाची मागणी केली असेल त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून पीक कर्ज रकमेच्या दहा टक्के अतिरिक्त पीक कर्ज मंजुर करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. (प्रतिनिधी)