शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

दुर्मीळ जखमी घुबडावर दहा टाक्यांची शस्त्रक्रिया. वाईतील प्राणीमित्रांमुळे मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:11 IST

जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मीळ घुबडाला येथील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. या घुबडावर चक्क दहा टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी घुबडावर दोन महिने उपचार केले जाणार आहेत.

ठळक मुद्देदुर्मीळ जखमी घुबडावर दहा टाक्यांची शस्त्रक्रियावाईतील प्राणीमित्रांमुळे मिळाले जीवदानकात्रजच्या प्राणी संग्रहालयात उपचार सुरू

वाई : जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मीळ घुबडाला येथील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. या घुबडावर चक्क दहा टाक्यांचीशस्त्रक्रिया करण्यात आली असून, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी घुबडावर दोन महिने उपचार केले जाणार आहेत.वाई औद्योगिक वसाहतीतील एका संरक्षण कठड्यावर मासेमारी करणारे एक दुर्मीळ घुबड पर्यावरणप्रेमी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधून जखमी घुबडाला वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या ताब्यात दिले.

यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील देशपांडे, डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी घुबडावर उपचार सुरू केले. या घुबडावर दहा टाक्यांचे आॅपरेशन करण्यात आले. मासेमारी करण्यासाठी दबा धरून बसले असता संरक्षण भिंतीच्या तारेत पंख अडकल्याने हे घुबड जखमी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंखांच्या हाडांना गंभीर दुखापत झाल्याने घुबडाला पुढील उपचारासाठी राजीव गांधी प्राणी अनाथालय, कात्रज (पुणे) येथे हालविण्यात आले आहे. त्याच्या पंखांचा एक्सरे काढण्यात आला असून, त्याच्यावर या अनाथालयात किमान दोन महिने उपचार केले जाणार आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे. 

वाई येथे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या दुर्मीळ घुबडावर कात्रज येथील अनाथालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. हे दुर्मीळ प्रजातीचे घुबड असून, याला इंग्रजीत नाव ब्राऊन फिश ओवल तर मराठीत तपकिरी मत्स्य घुबड म्हणतात. कोकणात याला हुमन या नावाने ओळखले जाते. हा घुबड छोटे पाणवठे, ओढे-नाले येथे मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. भात शेती परिसरातही याचा अधिवासअसतो. या घुबडाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.- महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल, वाई

टॅग्स :forest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर