आॅक्टोबरमध्ये दहा सुट्यांचा बोनस !

By Admin | Updated: October 1, 2014 01:11 IST2014-10-01T01:08:43+5:302014-10-01T01:11:01+5:30

नोकरदारांची चंगळ : चौथ्या शनिवारमुळे दिवाळीत सलग चार दिवसांची मजा

Ten bonuses bonuses in October! | आॅक्टोबरमध्ये दहा सुट्यांचा बोनस !

आॅक्टोबरमध्ये दहा सुट्यांचा बोनस !

सातारा : यंदा दिवाळी थोडी लवकरच आली आहे. ती आॅक्टोबरमध्ये असल्याने सरकारी नोकरदारांची खरी चंगळ या महिन्यात आहे. गांधी जयंती, दसरा, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, दुसरा, चौथा शनिवारसह चार रविवार या महिन्यात आल्याने चक्क दहा दिवसांची सुटी मिळणार आहे.
व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर सध्या आॅक्टोबर महिन्यातील सुट्या हा विशेष चर्चेत राहिला आहे. हे मेसेज आठ दिवसांपासून फिरत आहेत. त्यामुळे नोकरदारांचे कधी एकदा हा महिना सुरू होतोय, अशी अवस्था असते. शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सलग सुट्या असतात. मात्र, इतर नोकरदार व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सलग सुट्या मिळत नाहीत. त्यांच्यासाठी हा महिना ‘लकी’ आहे. त्यामुळे अनेकांनी आतापासून सुट्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
महात्मा गांधी जयंती गुरुवार, दि. २ रोजी आहे. या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना सुटी असते. मात्र, केंद्र शासनाने या दिवशी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यालयात येऊन कार्यालय स्वच्छ करावे. हा दिवस ‘स्वच्छ दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ‘ही सूचना केंद्र सरकारी कार्यालयांना आहे. आपल्याला अजून सूचना आलेल्या नाहीत, त्या आल्यानंतर पाहू यात,’ अशी चर्चा जिल्हा परिषदेसह इतर शासकीय कार्यालयांमध्ये रंगू लागली आहे.
गांधी जयंती पाठोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. ३ रोजी दसरा आहे. त्यानंतर रविवार, दि. ५ रोजी बकरी ईद आहे. बकरी ईद रविवारी असल्याने आणखी एक सुटी बुडल्याचे दु:ख मात्र काहीना निश्चित झाले आहे. या महिन्यात दिवाळी दि. २३ आक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. गुरुवार, दि. २३ रोजी लक्ष्मी पूजन, शुक्रवार, दि. २४ रोजी दीपावली पाडवा आहे.
या सुट्यानंतर लगेच २५ रोजी चौथा शनिवार असून, दि. २६ रोजी रविवार आहे. त्यामुळे दिवाळीत काही कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सलग चार सुट्या मिळणार आहेत. तसेच दि. ५, १२, १९, २६ रोजी रविवार आहेत. एकंदर ३१ दिवसांचा महिना असला तरी केवळ २१ दिवसच काम करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ten bonuses bonuses in October!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.