शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

टेम्पोची ट्रकला धडक; कर्नाटकचा चालक जखमी, पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:07 IST

पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव टेम्पोने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत टेम्पोचालक मंजुनाथ (वय २८, रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देटेम्पोची ट्रकला धडक; कर्नाटकचा चालक जखमी पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात

वेळे : पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव टेम्पोने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत टेम्पोचालक मंजुनाथ (वय २८, रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक मालट्रक (टीएन ५२ के ०५६२) पुण्याच्या दिशेने निघाला होता. ट्रक वेळे (ता. वाई) गावानजीक आल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने (केए ५२ ए ६१७२) ने ट्रकला जोरदार धडक दिली.या अपघातात टेम्पोचालक मंजुनाथ याचे दोन्ही पाय गाडीच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. तर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी चालकास उपचारासाठी तातडीने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक मनोज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर