राजपथावरील जखमांना तात्पुरती ‘मुरूमपट्टी’

By Admin | Updated: October 16, 2014 22:50 IST2014-10-16T22:07:57+5:302014-10-16T22:50:25+5:30

वाहनचालकांना दिलासा : दिवाळीच्या तोंडावर पालिकेची लगीन घाई

The temporarily 'murum strip' of Rajpath wounds | राजपथावरील जखमांना तात्पुरती ‘मुरूमपट्टी’

राजपथावरील जखमांना तात्पुरती ‘मुरूमपट्टी’


सातारा : शहरातील राजपथाला जगोजागी पडलेल्या चरी पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून मुजविण्यात आल्या. दिवाळीच्या तोंडावर राजपथावर तात्पुरत्या स्वरूपात का होईना ‘मुरुमपट्टी’ केली असली तरी वाहनचालक व नागरिकांतून या मार्गावर चांगल्याप्रकारे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
राजपथरावर वाहनांची सतत वर्दळ असते. रहदारीसासाठी हा प्रमुख मार्ग अवल्याने बसस्थानकातून राजवाड्याकडे दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असते. सुधारित पाणी योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी राजपथ जागोजागी खोदण्यात आला होता. नगरपालिकेपासून ते मोती चौकापर्यंत काढलेल्या या चरांमुळे वाहने आदळत होती. अशा परिस्थितीत पाऊस सुरू झाल्याने डांबरीकरणही करता येत नव्हते. परिणामी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. रात्रिच्यावेळी या चरी दिसत नसल्यामुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. गेली काही दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पालिकेने या रस्त्यावर पॅचिंगचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या चरी पालिकेमार्फत मुजविण्यात आल्या. राजपथरावरील पाणी योजनेच्या कामाची तपासणी झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे पालिका हाती घेणार आहे. (प्रतिनिधी)

निवडणुकीची आचारसंहिंता संपल्यानंतर सर्वच कामे ठप्प आहेत. सुधारित पाणी योजनेचे कामही गेल्या महिनाभरापासून बंद स्थितीत आहे. तसेच जलवाहिन्यांची तपासणी ही बहुतांश ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे अशा ठिकाणी रस्त्यांना डांबरीकरण केल्यास भविष्यामध्ये पुन्हा रस्ता खोदावा लागण्याची शक्यता असल्याने पालिनेने तुर्तास मलमपट्टीचे काम हाती घेतले आहे. ज्या रस्त्यांवर डांबरीकराणाची कामे झाली आहेत, त्या रस्त्यांवरही अखेरचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: The temporarily 'murum strip' of Rajpath wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.