शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 21:09 IST

आपल्याला कोणी तरी बाहेर काढावे म्हणून जिवाच्या आकांताने त्या अंधारात ओरडत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने याची माहीती लोणंद  पोलीसांना देताच लोणंद पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.

संतोष खरात/ लोणंद - पुणे सातारा रोडवर दि. १६ रोजी सालपे घाटात केनॉल जवळ रात्रीच्या सुमारास टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने चालकासह टेम्पो पुलाचे कठडे तोडून सुमारे चाळीस ते पन्नास फूट खाली कालव्याच्या मोठ्या दगडात कोसळला. यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता. आपल्याला कोणी तरी बाहेर काढावे म्हणून जिवाच्या आकांताने त्या अंधारात ओरडत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने याची माहीती लोणंद  पोलीसांना देताच लोणंद पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.

जखमी अवस्थेत टेम्पोत अडकलेल्या त्या चालकास प्रथम बाहेर काढण्याचे मोठे अवाहन लोणंद पोलीसांसमोर होते. त्या भयानक अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत लोणंद पोलीसांनी तत्परता दाखवत दोन क्रेन बोलविण्यात आल्या. या दोन क्रेनच्या साह्याने लोणंद पोलीसांची टीम दरीत उतरली. आयशर टेम्पो दोन मोठ्या दगडात अडकला होता. चालक जखमी अवस्थेत ओरडत होता. अंधाऱ्या रात्री बॅटरीच्या मदतीने मोठया तीन तासाच्या प्रयत्नानंतर गाडीचा दरवाजा तोडून प्रथम चालक सुमित पांडूरंग गावड रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर यास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याने या जखमी चालकास लोणंद पोलीसांनी जिवदान दिले आहे. 

यामध्ये  लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस हवालदार अतुल कुंभार, सर्जेराव सुळ, पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण, वाघमोडे, पोलीस पाटील शांताराम पाटील, पोलीस मित्र सागर शेळके, धनंजय धायगुडे , सुजित धायगुडे, अनिकेत कोळपे, महेश बिचुकले यांच्या तीन तासाच्या अथक परिश्रमामुळे जखमी अवस्थेत अडकलेल्या टेम्पो चालकास बाहेर काढून  वैद्यकिय उपचारासाठी पाठवणे शक्य झाल्याने जखमी टेम्पो चालक युवकास जीवदान मिळाले असून या सर्वांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातsatara-acसातारा