ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोची तीन वाहनांना धडक; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 12:40 IST2017-09-23T12:40:07+5:302017-09-23T12:40:07+5:30

सातारा : वडूथहून साताºयाकडे येत असताना टेम्पोचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो तीन वाहनांवर जाऊन आदळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा अपघात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास वाढे फाटा परिसरात झाला.

Tempo blasts three vehicles; One injured | ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोची तीन वाहनांना धडक; एक जखमी

ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोची तीन वाहनांना धडक; एक जखमी

सातारा : वडूथहून साताºयाकडे येत असताना टेम्पोचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो तीन वाहनांवर जाऊन आदळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा अपघात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास वाढे फाटा परिसरात झाला.

संबंधित टेम्पोने ट्रॅक्टर, ट्रक आणि एका कारला धडक दिली. यामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कारमधील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. रस्त्याकडेला उभ्या असणाºया वाहनांवर टेम्पो आदळल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.

टेम्पो चालकाला केबीनमधून बाहेर काढण्यात आले. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

नुकसान झालेल्या वाहनांचे पंचनामे करण्याचे काम पोलिसांचे सुरू होते. या अपघाताची अद्याप शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Web Title: Tempo blasts three vehicles; One injured