शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरचे तापमान १२ अंशावर, साताऱ्याच्या तापमानातही सातत्याने उतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:01 IST

मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवत होता. पण, तीन दिवसांपासून पारा घसरु लागला आहे. गुरुवारी तर साताऱ्यात १६ तर महाबळेश्वरचे १२ अंशावर तापमान होते. यामुळे हळू-हळू थंडीत वाढ होत असल्याचे जाणवू लागले आहे.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून थंडीचे आगमन झाले आहे. पण, हिवाळा ऋतु असूनही थंडीची तीव्रता जाणवत नाही. त्यातच अनेकवेळा तापमानात सतत चढ-उतार सुरु असतो. आठवड्यापूर्वी गारठा वाढला होता. त्यावेळी सातारा शहराचे किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचे तापमान १० अंशापर्यंत घसरले होते.

दोन दिवस तापमानात एकदम उतार आल्यानंतर पारा पुन्हा वाढला. सातारा शहराचा तर २१ अंशावर पोहोचला होता. यामुळे थंडी गायब होऊन उकाडा जाणवत होता. तर महाबळेश्वरचाही पारा १७ अंशापर्यंत गेलेला. त्यामुळे हिवाळी ऋतु असूनही लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. असे असतानाच मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.जिल्ह्याचा पारा हळूहळू कमी होत चालला आहे. सोमवारी सातारा शहराचे किमान तापमान २१.०३ अंश होते. तर मंगळवारी २०.०६ अंशाची नोंद झाली. बुधवारी १९.०३ तर गुरुवारी १६.०६ अंशापर्यंत तापमान कमी झाले. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही कमी होत चालला आहे. यामुळे हळू-हळू थंडी वाढताना दिसून येत आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान