पळसावडेच्या सरपंचपदी तेजश्री यादव बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:25+5:302021-02-27T04:51:25+5:30
वरकुटे - मलवडी : माण तालुक्यातील पळसावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजश्री रमेश यादव यांची, तर उपसरपंचपदी दादासो उत्तम डोंबाळे यांची ...

पळसावडेच्या सरपंचपदी तेजश्री यादव बिनविरोध
वरकुटे - मलवडी :
माण तालुक्यातील पळसावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजश्री रमेश यादव यांची, तर उपसरपंचपदी दादासो उत्तम डोंबाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अभिजित अशोक सरतापे, नयना विलास चव्हाण हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, तर ममता धनाजी जानकर, सयाजी बाबू जानकर, कौसल्या दत्ता यादव हे ग्रामपंचायत सदस्य गैैैरहजर होते.
ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत शंभू महादेव ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मंगळवार दिनांक २३ रोजी दुपारी
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. व्ही. महाडीक व ग्रामसेवक उमेश कोळी यांनी काम पाहिले. यावेळी कर्तव्यदक्ष पोलीसपाटील भाऊसाहेब चव्हाण उपस्थित होते. ॲड. विलास चव्हाण, चेअरमन कुंंडलिक यादव, खंडू डोंबाळे, प्रकाश चव्हाण, सुरेश यादव, महादेव सरतापे, शैलेश तोरणे, बाळासाहेब यादव, मधुकर पोळ, धनाजी चव्हाण, शंकर यादव, भागवत जानकर, दिलीप सकट या मान्यवरांसह अन्य ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
ग्रामस्थांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार असून, पळसावडे ग्रामस्थांच्या रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करणार.
तेजश्री यादव - नवनिर्वाचित सरपंच, पळसावडे