शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! सातारचा २२ वर्षीय 'वीरपुत्र' देशासाठी शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रेसाठी आला होता गावी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 20:14 IST

tejas mankar news : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. 

tejas mankar indian army । सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. तेजस लहुराज मानकर हा वीरपुत्र पंजाब भटिंडा कॅम्पमध्ये देशसेवेसाठी तैनात असताना डोक्यात गोळी लागली असता शहीद झाला. खरं तर तेजसला उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासाअंती तेजसला मृत घोषित केले. लक्षणीय बाब म्हणजे तेसस ज्या कॅम्पमध्ये तैनात होता तिथे झालेल्या गोळीबारात एकूण चार जवान शहीद झाले आहेत.

५ दिवसांपूर्वी होता गावात अन्...दरम्यान, तेजस अलीकडेच यात्रेसाठी गावी आला होता. गावची यात्रा उरकून तो पुन्हा देशसेवासाठी रूजू झाला पण सुट्टीवरून गेल्यानंतर पाचच दिवसांत तो देशासाठी शहीद झाल्याचे वृत्त समोर आले. घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच गावकऱ्यांसह जावली तालुक्यावर शोककळा पसरली. जाबमधील भंटिडा लष्करी छावणीत गोळीबार कुणी केला. याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

कुटुंबाचा वारसा जपणारा तेजस देशासाठी शहीद मात्र, तूर्त लष्कराने याला दहशतवादी हल्ला म्हटलेले नाही. या गोळीबाराच्या घटनेत तेजस मानकर याच्या डोक्याला गोळी लागली होती. शहीद जवानांना गोळी कशी लागली याबाबत देखील पोलिसांचे पथक अधिक तपास करत आहे. तेजस हा दोन वर्षांपूर्वीच लष्करात भरती झाला होता. त्याचे वडील देखील सैन्यदलात कार्यरत होते, ते मेजर पदावरुन निवृत्त झाले आहेत. याशिवाय त्याचा भाऊ देखील सध्या सैन्यदलात असून देशसेवा बजावत आहे. सैनिकांची धरती म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या सातारचा आणखी एक जवान शहीद झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :satara-acसाताराIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकMartyrशहीद