तिसऱ्यांदा चूक केल्यास तडीपार करणार तहसीलदारांचा इशारा :
By Admin | Updated: November 6, 2014 23:00 IST2014-11-06T22:15:30+5:302014-11-06T23:00:28+5:30
पाचगणीत अनधिकृत गौणखनिज वाहतुकीवर कारवाई

तिसऱ्यांदा चूक केल्यास तडीपार करणार तहसीलदारांचा इशारा :
पाचगणी : अनधिकृत उत्खनन आणि विनापरवाना गौनखनिज वाहतूक करणाऱ्यांनी तिसऱ्यांदा चूक केली तर तडिपारीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महाबळेश्वरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी दिला आहे. दरम्यान, गुरुवारी धडक मोहीमङ्कसुरू करून अशा प्रकाऱ्या चार गाड्या जप्त करून गाडी मालकांवर कारवाई करण्यात आली. पाचगणी विश्रामगृहाजवळ खाजासाहब अब्बास अली ओब्रेवारी (रा.गोडवली, ता.ङ्कमहाबळेश्वर) यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर (एएच ११ जी २९०९)ङ्कमधून लाल मातीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. महसूल विभागाने तातडीने या ट्रॅक्टरवर कारवाई करून जप्त केला. त्याचा चालक मानतेश भीमाप्पा संजीवा बोळ (रा. गोडवली) याला ट्रॅक्टरसह पाचगणी पोलीस ठाण्यात हजर केले. तर दुसऱ्या घटनेत गौंडाप्पा सिध्दप्पा हळी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एएच ११ जी ४२५६)मध्य अनधिकृतपणे एक ब्रास वाळू वाहतूक करताना काचबवाडी नाक्याजवळ ताब्यात घेतले. तर गुरेघर (ता.ङ्कमहाबळेश्वर) येथे संजय रामचंद्र ढेबे यांच्या ट्रॅक्टर(एएच ११ बीए२४२) व दत्तू लच्छप्पा तलवार यांच्या ट्रॅक्टर (एएच११ यू१०७०)मधून लाल मातीची अनधिकृत वाहतूक करताना या दोघांना ताब्यात घेतले. या चौघांचेही ट्रॅक्टर मालासह जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहेत. तर या गाडी मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पाचगणीचे तलाठी शशिकांत वणवे व भिलारचे तलाठी व्ही .एस.जाधव यांनी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण येवले व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. त्यामुळे यापुढे अशा प्रकारे कुणी अनधिकृतपणे माती उत्खनन, खुदाई, अनधिकृत व विनापरवाना गौनखनिज वाहतूक केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर) चोरटी वाहतूक वाढली तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, महाबळेश्वर तालुका हा संवेदनशील असून याठिकाणी अनधिकृत उत्खनन आणि अनधिकृत व विनापरवाना गौनखनिज वाहतूक करण्यास तसेच बोअरवेल घेण्यास बरेच निर्बंध आहेत. परंतु शासकीय यंत्रणेचा डोळा चुकवून ही कामे होत आहेत. धनिक लोक यात आघाडीवर आहेत.