प्रेयसीच्या घरासमोर तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: April 10, 2016 00:11 IST2016-04-09T23:51:15+5:302016-04-10T00:11:10+5:30

हडपसरमधील घटना : मोटारीत कोंडून पेटवून घेतले

The teenager committed suicide in front of a girlfriend's house | प्रेयसीच्या घरासमोर तरुणाची आत्महत्या

प्रेयसीच्या घरासमोर तरुणाची आत्महत्या

पुणे : प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही तिचा पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरसमोर पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. अजित आत्माराम इंगळे (वय २६, रा. मंगळवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे हा फलटणमध्ये इलेक्ट्रिकल ठेकेदार आहे. त्याचे नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही तरुणी हडपसर-सासवड रस्त्यावरच्या ग्लायडींग सेंटरसमोर राहण्यास आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी इंगळेचा लग्नाचा प्रस्ताव नाकारत तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतरही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझ्या घरासमोर आत्महत्या करेन’, अशी धमकी तो देत होता. गुढी पाडव्याच्या सणासाठी तरुणी माहेरी आली होती. याची माहिती मिळताच तो फलटणवरुन मित्राची मोटार घेऊन पुण्यामध्ये आला. तरुणीला फोन करुन त्याने ‘भेटायला ये, अन्यथा तुझ्या घरासमोर आत्महत्या करीन’ अशी धमकी दिली. तिच्या घरासमोर आल्यानंतर त्याने मोटारीमध्येच स्वत:ला पेटवून घेतले. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग भडकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवल्यावर इंगळेचा जळालेला मृतदेह मिळाला.

Web Title: The teenager committed suicide in front of a girlfriend's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.