शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र फोटो व्हायरलची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार, पब्जी खेळताना उत्तर प्रदेशमधील तरुणाशी ओळख

By दत्ता यादव | Updated: December 5, 2023 21:09 IST

ही धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून, संबंधित तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका १९ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून, संबंधित तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

उवैश नसीम अन्सारी (वय २४, रा. माैदाहा, ता. रागोल, जि. हमीदपूर, राज्य उत्तर प्रदेश), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पब्जी गेम खेळताना संबंधित तरुणीची उवैश याच्याशी ओखळ झाली. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये तो भेटण्यासाठी साताऱ्यात आला. त्यानंतर दोघेही अजिंक्यतारा किल्ला येथे गेले. त्याने तेथे तिचा विनयभंग केला. पुढे व्हॉट्सॲपवर सातत्याने विवस्त्र व्हिडीओ, फोटो देण्यासाठी तो धमकी देऊ लागला. 

२१ फेब्रुवारी २०२३ रोजी पीडित तरुणीला भेटण्यासाठी पुन्हा तो अजिंक्यतारा किल्ला येथे आला. तेथे काढलेले फोटो व तरुणीने पाठवलेले विवस्त्र फोटो ‘तुझ्या आई-वडिलांना पाठवेन,’ अशी धमकी देऊ लागला. तसेच २२ फेब्रुवारीला साताऱ्यातील एका लॉजवर नेऊन त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला व त्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केला. ते रेकॉर्डिंग घरातील लोकांना पाठवेन, अशी धमकी देऊन पुन्हा २४ ऑगस्ट रोजी त्याच लाॅलवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. 

हा प्रकार अखेर असह्य झाल्याने पीडित तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात सोमवार, दि. ४ रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :MolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस