शिक्षकांनी सदैव ज्ञानप्रवाहात कार्यरत राहावे : गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:00+5:302021-02-09T04:41:00+5:30
वाई : ‘शिक्षक हा आयुष्यभर शिक्षक असतो. समाजाला दिशा दाखविण्याचे काम शिक्षक करत असतात. भारताचे भविष्य असणारी तरुण पिढी ...

शिक्षकांनी सदैव ज्ञानप्रवाहात कार्यरत राहावे : गायकवाड
वाई : ‘शिक्षक हा आयुष्यभर शिक्षक असतो. समाजाला दिशा दाखविण्याचे काम शिक्षक करत असतात. भारताचे भविष्य असणारी तरुण पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. ज्ञानदान करताना ते प्रामाणिकपणे केल्यास विद्यार्थ्यांचा आशीर्वाद शिक्षकाला मिळत असतो. शिक्षकाने ज्ञानप्रवाहात राहून आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजाला ज्ञानदान करण्यासाठी कार्यरत राहावे,’ असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद संस्थेचे माजी सहसचिव एन. जी. गायकवाड यांनी केले.
यावेळी नगरसेवक भारत खामकर, प्राचार्य राजकुमार बिरामने, दिशा अकॅडमीचे संचालक डॉ. नितीन कदम, आरंभ संस्थेच्या संचालिका शोभा मूर्ती, जावळी बँकेचे संचालक शिवाजी नवसरे, शाळा समितीचे अध्यक्ष मोज्जम इनामदार, अशोकराव सरकाळे, मुख्याध्यापिका विजया बिरामणे, बी. ए. पाटील, दिलीप हगीर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, सेवक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.