शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST2021-01-10T04:29:38+5:302021-01-10T04:29:38+5:30
ढेबेवाडी (ता. पाटण) येथे आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अभिजित पाटील, प्रकाश पाटील, ...

शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत
ढेबेवाडी (ता. पाटण) येथे आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अभिजित पाटील, प्रकाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटणकर, आर. बी. पाटील, बाळासाहेब पाटील, सरपंच अमोल पाटील, सतीश कापसे, सतीश काळे, प्रल्हाद मोरे, जयवंत मोरे, वसंतराव रोडे, आदी उपस्थित होते.
हिंदुराव पाटील म्हणाले, आमदार आसगावकर हे पाठीमागची जाण ठेवणारे व्यक्तिमत्त्व आहे. आतापर्यंत निवडून आलेले आमदार या विभागाकडे पुन्हा कधी फिरकलेच नाहीत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या काळात ढेबेवाडीत काँग्रेस पक्षाचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. कार्यकर्त्यांनीही तळागाळापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविल्याने हे यश प्राप्त झाले आहे.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, पाटण तालुक्यातील मतदारांनी मला भरभरून मते दिली. त्यामुळे त्यांच्या ॠणात राहून त्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देऊ. पाटण तालुक्यात हिंदुराव पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनिष्ठपणे काम केल्याने तालुक्यातून चांगले मतदान झाले.
यावेळी अभिजित पाटील, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संजय लोहार यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग यादव यांनी स्वागत केले, तर आर. बी. पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०९केआरडी०२
कॅप्शन : ढेबेवाडी (ता. पाटण) येथे काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला.