शिक्षक प्रेमवीराला जमावाकडून बेदम चोप

By Admin | Updated: November 2, 2014 00:39 IST2014-11-02T00:37:38+5:302014-11-02T00:39:43+5:30

मुलीची छेड काढल्याचा आरोप

The teacher loved her from the crowd | शिक्षक प्रेमवीराला जमावाकडून बेदम चोप

शिक्षक प्रेमवीराला जमावाकडून बेदम चोप

सातारा : मुलीला अश्लील एसएमएस पाठवून छेडछाड केल्याच्या आरोपावरून एका युवकाला मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांसमोरच बेदम चोप दिला. ही घटना शनिवारी दुपारी गोडोली चौकीजवळ घडली.
गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूर येथील २३ वर्षीय युवक साताऱ्यात वास्तव्यास आहे. एका खासगी शिकविणीमध्ये तो शिक्षक म्हणून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलीशी त्याची ओळख झाली. त्या मुलीला एसएमएस पाठविण्यास सुरुवात केली. काही दिवस त्याने चांगले एसएमएस पाठविले. परंतु त्यानंतर त्याने अश्लील व प्रेमाचे एसएमएस पाठविण्यास सुरुवात केली. यानंतर युवतीने त्याला समज दिली होती. परंतु, त्याचे उद्योग काही थांबले नव्हते. शनिवारी सकाळी पुन्हा त्या मुलीला त्याने एसएमएस पाठविला. त्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी गोडोली चौकीत तक्रार नोंदविली. त्यानंतर पन्नास ते साठ जणांचा जमाव गोडोली चौकीसमोर जमा झाला. याचवेळी तो युवक तेथे आला होता. संतप्त जमावाने त्या युवकाला चोप दिला. पोलिसांनी अखेर त्या युवकाची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: The teacher loved her from the crowd