डोळ्यानं अंधूक दिसू लागल्याने शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:20+5:302021-09-17T04:46:20+5:30
सातारा : वयोमानानुसार डोळ्यानं अंधूक दिसू लागल्याने झालेल्या त्रासातून एका शिक्षकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना वाठार ते ...

डोळ्यानं अंधूक दिसू लागल्याने शिक्षकाची आत्महत्या
सातारा : वयोमानानुसार डोळ्यानं अंधूक दिसू लागल्याने झालेल्या त्रासातून एका शिक्षकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना वाठार ते वाइ जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
किसन शंकर कुंभार (वय ५५, रा. गोळीबार मैदान, शिवप्रेमी काॅलनी सातारा) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किसन कुंभार हे एका संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस होते. सर्कलवाडी, ता. कोरेगावच्या हद्दीत वाठार ते वाइ जाणाऱ्या रोडवर ६ सप्टेंबर रोजी
त्यांनी विषारी औषध प्राशन केले. यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दि. १० रोजी सकाळी सव्वानऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
त्यांना डोळ्यानं अंधूक दिसत होतं. तसेच कंबरेचाही त्रास होत होता. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना वाठार गावच्या हद्दीत घडल्याने या घटनेची नाेंद वाठार पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार विष्णू धुमाळ हे अधिक तपास करत आहेत.