मलकापुरातील करआकारणी प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

By Admin | Updated: April 10, 2015 00:28 IST2015-04-09T22:02:40+5:302015-04-10T00:28:38+5:30

नागरिकांच्या हक्कासाठी योग्य त्या न्यायमंडळाकडे न्याय मागण्यासाठी तयार असल्याचा इशारा

Taxation of the taxation process in Malkapur | मलकापुरातील करआकारणी प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

मलकापुरातील करआकारणी प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

कऱ्हाड : मलकापूर नगरपंचायतीने कर आकारणी करण्यासाठी केलेली प्रक्रियाच घाईगडबडीत व बेकायदेशीर केली आहे. विधीग्राह्य कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे. या गडबडीच्या प्रक्रियेमुळे नागरिकांच्या नैसर्गिक न्याय हक्कांचीच पायमल्ली झाली आहे. ही करआकारणी २०१५-२०१६ या सालाकरिता लागू करावी, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
नगरपंचायतीने २०१५-१६ या वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर आकारणीचा ठराव केला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र नगररचना विभागाने २०१४-१५ या वर्षापासूनच कर आकारणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे कळविल्याने स्थानिक प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. नागरिकांना विचार करण्यासाठी व आपले म्हणणे मांडण्यासाठी नवीन करआकारणी २०१५-१६ वर्षासाठी लागू करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास नागरिकांच्या हक्कासाठी योग्य त्या न्यायमंडळाकडे न्याय मागण्यासाठी तयार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Taxation of the taxation process in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.