तरूण सातारकर निघाले सायकलवरून कासला!
By Admin | Updated: July 15, 2015 00:44 IST2015-07-14T22:07:44+5:302015-07-15T00:44:18+5:30
या उपक्रमाला साताऱ्यातील निसर्गप्रेमी व सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘दि कास राईड’चा हा पहिला उपक्रम यशस्वी पूर्ण झाला असून याही पुढे सायकलची सफर

तरूण सातारकर निघाले सायकलवरून कासला!
सातारा : धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत चाललो आहे. त्यामुळे उत्तम आरोग्याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी सायकलवरुन ‘दि कास राईड’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशी माहिती, आशिष जेजुरीकर यांनी दिली.ते म्हणाले, सातारा शहर व परिसरामध्ये निसर्ग सौंदयार्चा अविभाज्य घटक म्हणून कास पठाराकडे पाहिले जाते. फुलांचा हंगाम सुरु होताच लाखो पर्यटक कास पठाराला भेट देतात.
आज धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत चाललो आहे. उत्तम आरोग्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सातारा ते कास व पुन्हा कास ते सातारा अशा ४५ किलोमीटर ‘दि कास राईड’चे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला साताऱ्यातील निसर्गप्रेमी व सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘दि कास राईड’चा
हा पहिला उपक्रम यशस्वी पूर्ण झाला असून याही पुढे सायकलची सफर सुरू राहणार असल्याचे जेजुरीकर यांनी सांगितले. ४५ किलोमीटर सायकलिंग पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला आहे, अशी प्रतिक्रिया उपक्रमात सहभागी सायकस्वारांनी दिली. (प्रतिनिधी)