शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

टँकरने पाणी देऊन जगवली झाडे । दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:32 IST

आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देटाकोबाईचीवाडीत उपक्रम

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : भयानक दुष्काळाचे चटके सोसत असताना निम्मे गाव पाणी टंचाईमुळे बाहेर पडले. त्याचा विचार करून ग्रामपंचायतीने त्याची कारणे शोधून वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. मात्र जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तरीही एक हजार खड्डे खोदून विविध प्रकारची झाडे लावून टँकरद्वारे पाणी घालून गाव हिरवेगार करण्याचा ध्यास टाकोबाईचीवाडीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतला आहे.

टाकोबाईचीवाडीचे सरपंच विशाल झणझणे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीने पाच वर्षांमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमातून शेकडो हेक्टरवर समतल चर खोदली. पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृषी विभाग, कमिन्स कंपनी व श्रमदानातून पाच-सहा सिमेंट बंधारे बांधले. काही दुरुस्त करून त्यामधील गाळ काढला. त्यामध्ये पाणीसाठा झाला. बंधाऱ्यात पाणीसाठा झाल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे भयानक दुष्काळात पाणी टंचाई कमी प्रमाणात भासली.

जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असताना ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सा'ाने काळुबाई मंदिरापर्यंत खड्डे खोदले. मुरमाड व खडकाळ जमीन असल्याने एक हजारपैकी शंभर खड्डे भूसुरुंगद्वारे काढण्यात आले. त्यामध्ये बंधाºयातील गाळ भरून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे.गाव पाणीदार तसाच.. हिरवागारही होणारटाकोबाईचीवाडी गाव मुरबाड व खडकावर वसले आहे. येथे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अर्र्धा गाव शहरात गेले आहे. धोम-बलकवडी पाणी, ओढाजोड प्रकल्पामुळे गाव हिरवेगार झाले आहे. पण झाडांची संख्या कमी असल्याने दहा वर्षांपासून ग्रामस्थांनी झाडे लावली आहेत. टाकोबाईचीवाडीच्या झाडाला तारक ठरला. झाडांची वाढ पाच महिन्यांत चार-पाच फुटांपर्यंत झाली आहे. आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

गाव दुष्काळी छायेत असताना सावली बचत गटाने दहा वर्षांपूर्वी जनावरांची छावणी सुरू केली होती. तेव्हा झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करून छावणीच्या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती.- विलासराव झणझणे, माजी सरपंच, टाकोबाईचीवाडी

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater transportजलवाहतूक