शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवेळी टँकर आला धावून, ढेबेवाडीत उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:00 IST

water shortage, sataranews ढेबेवाडी, ता. पाटण येथे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने चार दिवस पाणी टंचाई निर्माण झाली होती. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. अशावेळी येथील जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा दिला.

ठळक मुद्दे पाणी टंचाईवेळी टँकर आला धावून, ढेबेवाडीत उपाययोजना जिल्हा परिषद सदस्यांनी जपली बांधिलकी

ढेबेवाडी : ढेबेवाडी, ता. पाटण येथे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने चार दिवस पाणी टंचाई निर्माण झाली होती. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. अशावेळी येथील जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा दिला.ढेबेवाडी हे या विभागातील मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण आहे. याठिकाणी विभागातील पन्नास ते साठ गावे आणि वाडी-वस्तीतील ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. बाजारपेठेच्या या गावामधील राजकारण अनेक वर्षे पाणीप्रश्नावर रंगलेले दिसून येत आहे. या गावातील पहिली पाणी पुरवठा योजना १९७२ मध्ये कार्यान्वित झाली होती.

पस्तीस ते चाळीस वर्षे या योजनेवर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत होते. कालबाह्य झालेल्या योजनेमुळे पाण्यासाठी नेहमीच वणवण करावी लागत होती. अखेर २००९ मध्ये येथे भारत निर्माण योजना नव्याने राबवण्यात आली. ही पाणीपुरवठा योजनाही अनेक वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडली. सध्या या योजनेद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो.गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर भोसगावच्या शिवारामध्ये दक्षिण वांग नदीच्या काठावर आहे. सध्या वांग-मराठवाडी धरणातील पाणीसाठ्यामुळे या परिसरात बारमाही पाणी असते. परिणामी, ढेबेवाडीची योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. मात्र विहिरीतील दोन वीज पंप अचानक नादुरुस्त झाल्याने सलग चार दिवस पाणीपुरवठा खंडित झाला.

ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने नादुरुस्त झालेले पंप विहिरीतून काढून कऱ्हाडला दुरुस्तीसाठी पाठवले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर शुक्रवारी ते पंप पुन्हा विहिरीत बसविण्यात आले.ग्रामस्थांना मिळाला दिलासागावात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर ढेबेवाडीतील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेत रमेश पाटील यांनी तातडीने पाण्याचा टँकर पाठवून टंचाईच्या काळात ग्रामस्थांना दिलासा दिला.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर