टाकी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:45+5:302021-03-09T04:41:45+5:30

कऱ्हाड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणी साठवण टाक्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तांबवेत टाकी ...

The tank is dangerous | टाकी धोकादायक

टाकी धोकादायक

कऱ्हाड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणी साठवण टाक्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तांबवेत टाकी कोसळून दुर्घटना घडल्यानंतर गावोगावच्या धोकादायक टाक्यांचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, हा सर्व्हे केवळ कागदावर राहिला. प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्यामुळे धोकादायक टाक्या त्याच स्थितीत आहेत.

मास्ककडे दुर्लक्ष (फोटो : ०८इन्फोबॉक्स०२)

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू असल्यामुळे तसेच सध्या विवाह समारंभासह सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. मात्र, अशात कोरोनाच्या नियमांना तिलांजली दिली जात असून, अनेकजण विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे.

फूलझाडांना बहर

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात पालिका प्रशासनाच्यावतीने सौंदर्याच्यादृष्टीने आयलँडमध्ये विविध प्रकारची फूलझाडे लावण्यात आलेली होती. त्याची सध्या काळजी घेतली जात आहे. दिवसात एकदा त्यांना पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने या फूलझाडांना चांगलाच बहर आला असून, ही फूलझाडे शहराची शोभा वाढवित आहेत.

झाडांचा धोका

कऱ्हाड : सुपने-किरपे दरम्यानच्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. वाढलेल्या झाडांमुळे वळणावर समोरून आलेले वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता चांगला असल्याने या रस्त्यावरून वाहने सुसाट जात असतात. त्यातच पुढचे वाहन न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्लास्टिकचा वापर

कऱ्हाड : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची मोहीम थंडावली असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही व्यापारी, दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत.

Web Title: The tank is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.