श्कूलचा पैला दिवश.. शेल्फी ले ले लेऽऽ
By Admin | Updated: June 16, 2016 01:01 IST2016-06-16T00:03:08+5:302016-06-16T01:01:18+5:30
उत्साह आणि हुरहूरही : जिल्ह्यातील शाळांमध्ये नवागतांचे जल्लोषात स्वागत
श्कूलचा पैला दिवश.. शेल्फी ले ले लेऽऽ
सातारा : तीच शाळा, तीच रिक्षा, तेच सवंगडी हे सगळं जुनं असलं तरीही नवं दप्तर, नवीन पुस्तकं आणि नवीन गणवेश घालून चिमुकल्यांनी आज शाळांच्या सुन्या-सुन्या भिंतीवर पुन्हा एकदा कि लबिलाटाचे वातावरण पसरविले.
सातारा शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. विद्यार्थी वाहतूक बसने जाणाऱ्या अनेक पाल्यांना शाळेचा पहिला दिवस म्हणून आज पालकांनी सोडले. दीड महिन्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटून ही चिमुरडी भलतीच हरकली होती. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळेचा परिसरही चांगलाच गजबजून गेला होता.
शाळेचा पहिला दिवस म्हणून अनेकांनी वेळेत शाळा गाठली. नवीन वर्ग शोधताना चिमुकल्यांची होणारी गडबड लक्षात घेऊन अनेक शिक्षकांनी स्वयंसेवकांची भूमिका स्वीकारली होती. वर्गात बसल्यानंतर आपल्याकडील नवीन आणि हटके वस्तू परस्परांना दाखविण्याचा मोह चिमुरड्यांना आवरता आला नाही. बहुतांश शाळांनी दोन तासांतच विद्यार्थ्यांना घरी सोडले. (प्रतिनिधी)