धरणे लागली भरू...

By Admin | Updated: July 22, 2015 23:56 IST2015-07-22T21:29:40+5:302015-07-22T23:56:39+5:30

साताऱ्यात रिमझिम : शेतकरी समाधानी

Take the dam | धरणे लागली भरू...

धरणे लागली भरू...

सातारा : रानोमाळ पळून गेलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. महाबळेश्वरमध्ये बुधवारी धो धो पावसाची बरसात तर साताऱ्या रिमझिम पाऊस पडला.
गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पेरण्या करून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला होता, मात्र आभाळातून एक ठिपूसही गळत नव्हता. जिल्हावासीयांनी मंगळवारी ‘माउलीं’ना निरोप देत पावसाचे साकडे घातले अन् सातारासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. महाबळेश्वर, वाई, जावळी, पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर माण, खटाव, फुलटण, खंडाळा तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. सातारा शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचे प्रमाण कमी होते.
पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर पावसाअभावी अद्याप पेरणी न झालेल्या क्षेत्रातही असाच पाऊस राहिला तर पेरण्या करता येणार आहेत.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात प्रतिसेकंद १७ हजार ७०४ क्सुसेक पाण्याची भर पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आजअखेर ५७.०६ टीएमसीवर पोहोचला आहे. (प्रतिनिधी)

बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस असा-कोयना १६ मिमी., नवजा २३ मिमी., तर महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २.४१ टीएमसीने वाढ झाली आहे.पाच धरणांतून विसर्ग
जिल्ह्यात काल जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीत वाढ होत आहे. कालपासून वीर धरणातून २ हजार ३७७ क्युसेक, मोरणा-गुरेघरमधून ३२० क्सुसेक, तारळी १४५ तर

बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस असा-कोयना १६ मिमी., नवजा २३ मिमी., तर महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २.४१ टीएमसीने वाढ झाली आहे.उरमोडीमधून ४५० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर बुधवारी वांग धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

Web Title: Take the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.