पाटण साहित्य संमेलनातील ‘त्या’ वक्त्यांवर कारवाई करा!

By Admin | Updated: October 13, 2016 02:38 IST2016-10-13T02:28:34+5:302016-10-13T02:38:15+5:30

देसाई यांची मागणी : ‘हा तर दहशतवादच,’- इति प्रज्ञा पवार

Take action against 'those' speakers in Patan literature convention! | पाटण साहित्य संमेलनातील ‘त्या’ वक्त्यांवर कारवाई करा!

पाटण साहित्य संमेलनातील ‘त्या’ वक्त्यांवर कारवाई करा!

सातारा : ‘पाटण येथील ‘मसाप’च्या विभागीय साहित्य संमेलनात महापुरुषांबाबत भडक वक्तव्ये करणाऱ्या साहित्यिकांच्या भाषणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी,’ अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे. या संमेलनात प्रा. डॉ. रावसाहेब कसबे व प्रा. डॉ. प्रज्ञा पवार यांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या अवमान करणारी वादग्रस्त वक्तव्ये केल्याच्या आरोपानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी या दोघांनाही संमेलनाचे स्थळ सोडण्याचा आग्रह धरला होता. समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून संयोजकांनीही तातडीने पुढील नियोजित कार्यक्रम रद्द केला होता. यानंतर या दोन साहित्यिंकावर कायदेशीर कारवाई करावी, अशामागणीचे निवेदन आमदार देसाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, ‘मी कोणत्याही राष्ट्रपुरुषाची बदनामी केली नाही. तरीही ज्या पद्धतीने आम्हाला पाटणमधून बाहेर जायला सांगितले, हे अत्यंत निंदाजनक व
निषेधार्ह आहे. हा एक प्रकारचा दहशतवादच आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रा. डॉ. प्रज्ञा पवार यांनी या घटनेबाबत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Take action against 'those' speakers in Patan literature convention!