तडीपार गुंड दत्ता घाडगेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:38+5:302021-09-08T04:47:38+5:30

सातारा : शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना तडीपार गुंड दत्ता उत्तम घाडगे (रा. सूर्यवंशी कॉलनी, ...

Tadipar goon Datta Ghadge arrested | तडीपार गुंड दत्ता घाडगेला अटक

तडीपार गुंड दत्ता घाडगेला अटक

सातारा : शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना तडीपार गुंड दत्ता उत्तम घाडगे (रा. सूर्यवंशी कॉलनी, दौलतनगर, सातारा) हा पोलीस पथकाला आढळून आला. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला.

याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. शाहुपुरी पोलिसांचे पथक शोधमोहीम राबवत असताना सातारा शहरातील रेकॉर्डवरील गुंड दत्ता उत्तम घाडगे हा आढळून आला. गुंड दत्ता घाडगे हा तडीपार आहे. शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून दाखल झालेल्या तडीपारीच्या प्रस्तावावरून प्रांताधिकाऱ्यांकडून त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. मात्र, हद्दपार केले असतानाही तो कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान जिल्ह्यात आढळून आल्यामुळे त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती शाहुपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

Web Title: Tadipar goon Datta Ghadge arrested