भरचौकात युवकावर तलवार हल्ला
By Admin | Updated: June 30, 2014 23:52 IST2014-06-30T23:39:21+5:302014-06-30T23:52:28+5:30
पुसेगावमध्ये गुन्हा : सहा हल्लेखोर पसार; पोलीस पथके रवाना

भरचौकात युवकावर तलवार हल्ला
पुसेगाव : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन पुसेगाव येथील सहा युवकांनी पुसेगाव येथील युवकावर तलवार हल्ला केला. यामध्ये विकास जाधव गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुसेगाव चौकानजीक घडली. पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकानजीक फलटण रस्त्यावर विकास जाधव उभा असताना अचानक नितीन भीमराव खरात, श्रीकांत ऊर्फ रामा हणमंत मदने, अनिकेत ऊर्फ बबल्या संजय मदने, विशाल मदने, अजित वाघ (सर्व रा. पुसेगाव) आणि विशाल रामभाऊ शिर्के (रा. पसरणी, ता. वाई) यांनी विकासवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात विकासची पाठ व हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला करून संशयित फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. (वार्ताहर)