शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: 'स्विंग वोटर्स'चे निवडणूक आयोगासमोर आव्हान

By दीपक देशमुख | Updated: November 29, 2025 19:22 IST

मतदारांना आमिष दाखवण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके

सातारा : नगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांची संख्या कमी असल्याने एकेक मत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत आमिषाला बळी पडणारे मतदार म्हणजचेच स्विंग वोटर्सना आदल्या दिवशी किंवा रात्री रोख वाटपाचे, जेवणावळी आदींचे प्रलोभन दाखवून प्रभाव टाकण्याचे प्रकार चुपके-चुपके होवू लागले आहेत. असे प्रकार रोखण्याचे निवडणूक आयोगापुढे मोठे आव्हान आहे.

प्रलोभनांची रेलचेल वाढलीजिल्ह्यात पालिका निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रलोभनांचे प्रकार सुरू झाले आहेत. शहरातील अनेक भागांत रात्री जेवणाचे कार्यक्रम, हॉटेलमधील गुप्त बैठकांसाठी होणारे खर्च हे उमेदवार थेट न देता त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी भागवले जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराचे खात्यावर व्यवहार दिसत नसले तरी खूप आधी हे विश्वासू कार्यकर्त्यांकडे रक्कम सुपूर्द केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आदल्यादिवशी सतर्कता आवश्यकप्रचार थांबल्यानंतरच्या रात्रीपासून पैसे वाटप होण्याची जास्त असते. यासाठी जागरूक कार्यकर्ते सतर्क असतात. तथापि, ही आयोगाचीही जबाबदारीही आहे. त्यामुळे स्विंग वोटर्सवर प्रभाव टाकणारे प्रकार रोखण्यासाठी आयोगाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

भरारी पथके वाढविण्याची गरजनिवडणुकीच्या काळात सर्व प्रभागांत भरारी पथके, निरीक्षण पथके आणि उशिरापर्यंत गस्त वाढवण्याची गरज आहे. तसेच मोठ्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी, संशयास्पद हालचाली, रात्री उशिरा फिरणारी वाहने, हॉटेलमधील चहापान किंवा कार्यक्रमांच्या आडून होणाऱ्या व्यवहारांवर कठोर नजर ठेवणे अनिवार्य ठरत आहे.

स्विंग वोटर?मतदारांपैकी काही जण विशिष्ट पक्षाशी किंवा विचारांशी बांधील असतात. मात्र काही मतदारांचे निर्णय मतदानाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही ठरलेले नसतात. हेच मतदार म्हणजे स्विंग वोटर्स. साधारणतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मतदारांना ओळखून काही उमेदवार विविध आमिषे दाखवून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कांटे की टक्कर असलेल्या प्रभागांत एकेक मत निर्णायक ठरू शकते; त्यामुळे अशा ठिकाणी पैसे वाटपासारखे प्रकार होण्याची शक्यता अधिक असते.

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी दोन भरारी पथके नियुक्त केली आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांकडून तक्रार आल्यास त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे.  - आशिष बारकूल, निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा

English
हिंदी सारांश
Web Title : Local Elections: 'Swing Voters' Pose Challenge for Election Commission

Web Summary : Satara's municipal elections face the challenge of 'swing voters' susceptible to inducements. Authorities are increasing vigilance to curb vote-buying and illegal activities, deploying flying squads and monitoring suspicious transactions to ensure fair elections. Stricter measures are needed to prevent manipulation.