पळशीच्या वृद्धेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू
By Admin | Updated: August 30, 2015 00:13 IST2015-08-30T00:11:22+5:302015-08-30T00:13:40+5:30
मृतांची संख्या पाच : साताऱ्यात आणखी तीन संशयित

पळशीच्या वृद्धेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू
सातारा/शिरवळ : जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले असून, खंडाळा तालुक्यातील पळशी येथील सुमन शंकर भरगुडे (वय ६५) यांचा पुणे येथे शनिवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातून तीन जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात पाचजणांचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला आहे.
‘स्वाइन फ्लू’चा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सुमन भरगुडे या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांना ‘स्वाइन फ्लू’असल्याचे निप्षन्न झाले. अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पळशीसह शिरवळ परिसरात आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली
आहे. (प्रतिनिधी)