‘कृष्णा’च्या साखरेचा गोडवा आता सातासमुद्रापार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:25+5:302021-02-05T09:14:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या केंद्र शासनाने कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारावी, साखर कारखान्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ...

‘कृष्णा’च्या साखरेचा गोडवा आता सातासमुद्रापार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या केंद्र शासनाने कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारावी, साखर कारखान्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून साखर निर्यात योजना जाहीर केली आहे. या योजनेस अनुसरून आणि मागील तसेच चालू हंगामातील शिल्लक साखर साठा विचारात घेऊन आणि सध्या पांढऱ्या साखरेला बाजारात कमी प्रमाणात असलेली मागणी, पर्यायाने मंदावलेला साखरेचा उठाव, बाजारात घसरलेले साखरेचे दर अशा अनेक बाबींचा विचार करून कारखान्यात रॉ शुगरची निर्मिती करण्याचे धोरण सर्वत्र अंगीकारण्यात आले आहे. या रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी २०२०-२१ या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात पाच लाख क्विंटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचेही उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित करण्यात आलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी नुकताच पाठविण्यात आला.
या ट्रकचे विधिवत पूजन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, गिरीश पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, गुणवंतराव पाटील, निवास थोरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, रघुनाथ मोहिते, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, मुकेश पवार, पी. डी. राक्षे, आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : ३०केआरडी०२
कॅप्शन : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे कृष्णा कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेचा ट्रक निर्यातीसाठी रवाना करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.