बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मधुर भोसलेला कांस्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:53+5:302021-09-17T04:46:53+5:30
सातारा : बुलडाणा येथे झालेल्या ९० व्या वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सातारा बॉक्सिंग ॲकॅडमीच्या मधुर दौलत ...

बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मधुर भोसलेला कांस्य पदक
सातारा : बुलडाणा येथे झालेल्या ९० व्या वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सातारा बॉक्सिंग ॲकॅडमीच्या मधुर दौलत भोसले याने ९२ प्लस वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून कांस्यपदक पटकावले. तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे स्टार टू पंचाधिकारी संजय पवार यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. याबद्दल दोघांचाही सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सत्कार केला. या वेळी युवा करिअर ॲकॅडमीचे अध्यक्ष विश्वास मोरे, तुषार शिंदे आदी उपस्थित होते. मधुर भोसले याला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, प्रशिक्षक विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल भोसले आणि पवार यांचे सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव राजेंद्र हेंद्रे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग, विभागीय सचिव योगेश मुंदडा, जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सातारा बॉक्सिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष हरीश शेट्टी, सचिव रवींद्र होले, अमर मोकाशी, विजय मोहिते, बापूसाहेब पोतेकर, सुनीलकुमार रासकर, गजानन फरांदे, गणेश माने, शैलेंद्र भोईटे व सर्व पदाधिकारी, पालक, खेळाडू यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ- सातारा येथे मधुर भोसले आणि संजय पवार यांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केला.
फोटो नेम : १३सागर