दारू पिल्याचा बोभाटा केल्याने तलवार हल्ला
By Admin | Updated: May 31, 2014 00:30 IST2014-05-31T00:28:22+5:302014-05-31T00:30:03+5:30
डिस्कळ येथील घटना : पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दारू पिल्याचा बोभाटा केल्याने तलवार हल्ला
पुसेगाव : ‘आपण दारू पितो’, हे इतरांना सांगितल्याने चिडून संबंधिताच्या घरात घुसून त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी डिस्कळ (ता. खटाव) येथील एकावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र हरिबा पवार (वय ३३) यांनी राजेंद्र भीमराव काळे (४०, दोघे रा. डिस्कळ) याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, राजेंद्र काळे हा दारू पिला आहे, असे मी गावातील इतर तिघा-चौघांना सांगितल्याने राजेंद्र काळे याने रागाने चिडून येऊन माझ्या गुडघा व मांडीवर तलवारीने गंभीर वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार नंदकुमार खाडे व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी जखमी राजेंद्र पवार याला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. राजेंद्र काळे हा अद्याप फरार असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार नंदकुमार खाडे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)