शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

स्वागत कमान वाद: लाँग मार्चमधील बेडगच्या ७ जणांवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार

By दीपक शिंदे | Updated: September 23, 2023 12:17 IST

सांगलीचे वरिष्ठ अधिकारी साताऱ्यात, आंदोलकांच्या प्रकृतीबद्दल चाैकशी

सातारा : बेडग (ता. मिरज, जि. सांगली ) येथील ग्रामस्थांनी स्वागत कमान बांधण्यासाठी मुंबईकडे लाँग मार्च सुरू केला असून यामधील ७ जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच सांगली जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सरकारी रुग्णालयात भेट देत आंदोलकांच्या प्रकृतीची चाैकशी केली.बेडग येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आणि ती पुन्हा बांधण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी मुंबईला जाण्यासाठी लाँग मार्च सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथून याला सुरुवात झाली. हा लाँग मार्च पुणे-बंगळुरु महामार्गाने जात असून गुरुवारी साताऱ्यात आंदोलक आले.

त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर पाच जणांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी दाखल केले. तर, शुक्रवारी सकाळी आणखी तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील एकाला उपचारानंतर सोडण्यात आले आहे. सध्या ७ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

साताऱ्यात आंदोलकांवर उपचार सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे हे शुक्रवारीच जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. त्यांनी उपचार घेत असणाऱ्या आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रकृतीबद्दल माहिती घेतली. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.

आंदोलक उपचारानंतर पुन्हा लाँग मार्चमध्ये...माणगावमधून सुरू झालेल्या लाँग मार्चला १२ दिवस झाले आहेत. यामध्ये एक वर्षापासून ९५ वर्षांपर्यंतचे ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. त्यातील काही जण हे शाळकरी विद्यार्थीही आहेत. तर, उपचारानंतर आम्ही पुन्हा लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहोत, असे उपचार घेणाऱ्या आंदोलकांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगली